देशात पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म

देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म देण्याचा प्रयोग देशात पहिल्यांदाच यसश्वी झाला आहे. 

पुणे : देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची अंडी इन्क्युबेटरमध्ये कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म देण्याचा प्रयोग देशात पहिल्यांदाच यसश्वी झाला आहे.  पिंगोरी येथे ईला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हा प्रयोग करण्यात आला असून, या प्रयोगानंतर आता शेतात किंवा कुठेही मोराची अंडी आढळल्यास ती कृत्रिमरीत्या उबवणे शक्य होणार आहे.

ज्येष्ठ पक्षितज्ञ आणि ईला फाउंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे यांनी ही माहिती दिली. मोराच्या अंडय़ांना भटके श्वान, मुंगूस, कोल्हा, तरस अशा प्राण्यांपासून धोका असतो. काही वेळा लांडोरीकडून अंडय़ांची उबवणी पूर्ण न झाल्यास ती अंडी वाया जातात. मात्र ईला फाउंडेशनने या अडचणीवर मार्ग काढत कृत्रिम पद्धतीने अंडी उबवण्यासाठीचा इन्क्युबेटर विकसित केला आहे. ईला फाउंडेशनच्या राहुल लोणकर, आविष्कार भुजबळ आणि राजकुमार पवार यांचा यात सहभाग आहे.

डॉ. पांडे म्हणाले, की वन्यजीव संरक्षण प्रतिबंधक कायदा १९७२ अनुसार मोर हा संरक्षित पक्षी आहे. त्यामुळे मोराची अंडी हाताळण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र मोराची अंडी कुठे पडलेली आढळल्यास दया म्हणून काही वेळा लोकांकडून ती अंडी कोंबडीच्या माध्यमातून उबवण्याचा प्रयत्न केला जातो.  मोराची अंडी आकाराने मोठी असतात. त्यामुळे ती अंडी कोंबडीकडून योग्य रीतीने उबवली जात नाहीत, कोंबडी ती अंडी अर्धवट सोडून देते आणि ती अंडी वाया जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Country peacock incubator ysh

Next Story
“…पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही” ; फडणवीसांचं विधान!
फोटो गॅलरी