scorecardresearch

Premium

वापरलेल्या कंडोमच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा तयार करा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा नगरविकास विभागाला आदेश

वापरलेल्या कंडोमची विल्हेवाट लावण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) राज्याच्या नगरविकास विभागाला दिले आहेत.

disposal of used condoms
वापरलेल्या कंडोमच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा तयार करा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा नगरविकास विभागाला आदेश (image – pixabay/representational image)

पुणे : वापरलेल्या कंडोमची विल्हेवाट लावण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) राज्याच्या नगरविकास विभागाला दिले आहेत. २०१८मध्ये सहयोग ट्रस्टच्या ‘लॉयर्स फॉर अर्थ जस्टिस’चे कायद्याचे विद्यार्थी निखिल विद्याधर जोगळेकर, बोधी श्याम रामटेके, वैष्णव गजानन इंगोले, विक्रांत अनिल खरे, ओंकार अजित केनी आणि शुभम दीपक बिचे यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आदेश दिला असून, वापरलेल्या कंडोमला अविघटनशील कचरा मानण्याबाबतचा दुर्लक्षित विषय चर्चेत आला आहे.

ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले यांच्या मदतीने दाखल केलेल्या या पर्यावरणहित याचिकेत पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालय, राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक, पुणे जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य कायदेशीर सल्लागार समिती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध सहा कंडोम उत्पादक कंपन्यांना प्रतिवादी करण्यात आले होते. वापरलेले कंडोम फेकण्यासाठी वेगळे पाऊच उत्पादक कंपन्यांनी द्यावेत, वापरलेल्या कंडोमचा स्वतंत्र कचरा प्रवर्ग तयार करावा, वापरलेल्या कंडोमची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित सरकारी विभागांना सूचना द्याव्यात, कचरावेचकांना त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हातमोजे इत्यादी द्यावेत, वापरलेल्या कंडोमची विल्हेवाट कशी लावावी या बाबत उत्पादक कपन्यांनी जाहिरातींमधून माहिती द्यावी, कंडोमच्या पाकिटावर ते नष्ट कसे करावे याबाबत सूचना असाव्यात, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या होत्या.

celebration in Satara
सातारा : राज्य सरकारच्या निर्णयानंतर साताऱ्यात जल्लोष
Manoj-Jarange on Survey
सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता सर्वेक्षण होणार की नाही? राज्य मागासवर्गीय आयोगाचं स्पष्टीकरण
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
wastage of funds Kalyan mnc
कल्याण : स्वच्छता अभियानातील निधीची उधळपट्टी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी रोखली

हेही वाचा – यंदा कडाक्याची थंडी नाहीच ? हवामान विभागाचा अंदाज; डिसेंबरही सरासरीपेक्षा उष्ण राहणार

या याचिकेसंदर्भात कंडोम हा जैविकरित्या विघटन न होणारा कचरा असल्याने त्याला अविघटनशील कचरा मानले जावे, असे निरीक्षण एनजीटी खंडपीठाचे न्या. डी. के. सिंग, डॉ. विजय कुलकर्णी यांनी नोंदवले. तसेच महापालिकेने जाळण्याच्या प्रक्रियेद्वारे वापरलेल्या कंडोमची विल्हेवाट लावणे आवश्यक असून, त्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या शरद पवार गटाचे शक्ती प्रदर्शन, जयंत पाटील यांची सभा!

दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन होण्याची अपेक्षा करणे सध्या कठीण झाले आहे. त्यामुळे अतिशय वेगळ्या मुद्द्यावरच्या याचिकेवर हरित न्यायाधिकरणाने प्रक्रियावादी निर्णय घेतला आहे. आता वापरलेल्या कंडोमच्या विल्हेवाटीसाठीचा कृती आराखडा राज्याच्या नगरविकास विभागाने तयार करण्याची सहा महिने वाट पाहून त्यानंतर पुन्हा एनजीटीकडे संपर्क साधण्यात येईल, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Create an action plan for disposal of used condoms national green tribunal order to urban development department pune print news ccp 14 ssb

First published on: 01-12-2023 at 22:33 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×