राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांच्यासह ४० जणांवर गुन्हा

या प्रकरणी रूपाली पाटील यांच्यासह उदय महाले, निलेश निकम, महेश हांडे आणि ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


सेनापती बापट रस्त्यावर बेकायदा जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यां विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रूपाली पाटील यांच्यासह उदय महाले, निलेश निकम, महेश हांडे आणि ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन केले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crime against people including ncp rupali patil nationalist congress party chaturangi police station amy

Next Story
VIDEO: मला जगू द्याल की नाही? विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले
फोटो गॅलरी