पुणे स्टेशन परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा ; गुन्हे शाखेकडून १९ जणांच्या विरोधात गु्न्हा

पुणे स्टेशन परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

पुणे स्टेशन परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा ; गुन्हे शाखेकडून १९ जणांच्या विरोधात गु्न्हा
( संग्रहित छायचित्र )

पुणे स्टेशन परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जुगार अड्डयाचा मालक, कामगार तसेच जुगार खेळणारे अशा १९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

पुणे स्टेशन परिसरात ससून रुग्णालयासमोर पदपथावर तसेच तुकाराम शिंदे वाहनतळ परिसरात मटका खेळण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून जुगार अड्ड्याचा मालक, कामगार तसेच जुगार खेळणारे अशा १९ जणांच्या विरोधात कारवाई केली.

या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोकड, दोन मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, विनोद चव्हाण, मनीषा पुकाळे, हनुमंत कांबळे, अमित जमदाडे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : चिकन न आणल्याने शेजाऱ्यांकडून खून ; वाघोली परिसरातील घटना
फोटो गॅलरी