पुणे : मोटारीच्या धडकेत आरसा तुटल्याने जाब विचारणाऱ्या मोटारचालक आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना कल्याणीनगर भागात घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध विनयभंग, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

याप्रकरणी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि तिचे पती कल्याणीनगर भागातून रविवारी (८ डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास मोटारीतून निघाले होते. कल्याणीनगर परिसरातील मेट्रो पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने तक्रारदाराच्या महिलेच्या मोटारीला धडक दिले. धडकेत मोटारीचा आरसा तुटला. त्यामुळे महिलेच्या पतीने मोटारचालकाला जाब विचारला. मोटारचालकाने रस्त्यात वाद घालण्यास सुरुवात केली. मोटार रस्त्यात आडवी लावली. त्याने मोटारचालकाला धक्काबुक्की केली. शिवीगाळ करणाऱ्या आरोपी मोटारचालकाला समजाविण्यासाठी महिला मोटारीतून उतरली. तेव्हा आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य करुन शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केली. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे तपास करत आहेत.

Story img Loader