लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: वानवडी भागात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. पीयूष उर्फ अमन राजेश मरोटे (वय २०), सिद्धार्थ अनिल काकडे (वय २१, दोघे रा. वानवडी), आदित्य सुनील पिवळ (वय १९, रा. खडकी), हितेन रवींद्र यादव (वय १९, रा. आझम कॅम्पसजवळ, लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
Failed Robbery Attempt
माय-लेकींच्या धाडसाला सलाम! दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरांशी भिडल्या; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून आरोपींना अटक

वानवडी भागात दहशत माजविण्यासाठी मरोटे, काकडे, पिवळ, यादव यांनी वाहनांची तोडफोड केली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले होते. आरोपी रेसकोर्स परिसरातील एम्प्रेस गार्डनजवळ थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चौघांना अटक केली.

आणखी वाचा- पुणे रेल्वे स्थानकाची कोंडीतून सुटका? बस, मोटार, रिक्षासाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे पाऊल उचलणार

पोलीस आयुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप शिवले, उपनिरीक्षक अजय भोसले, अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड आदींनी ही कारवाई केली.