scorecardresearch

श्याम देशपांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली थेट टीका शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांना भोवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली थेट टीका शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांना भोवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार देशपांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केला आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडणी केलेल्या हिंदुत्वाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक दिशा दिली. मात्र संघावर अकारण राजकीय टीका करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही दिशा भरकटवली. संघाला राजकीय वादामध्ये प्रत्यक्ष ओढून शिवसेनेने काँग्रेसची री ओढली आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांनी शिवसेनेचे काम थांबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला नव्हता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Criticism cm expulsion shiv sena former city chief shyam deshpande shiv sena pune print news amy