चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाकडमध्ये भव्य रोड शो झाला. उघड्या गाडीतून लोकांना अभिवादन करत निघाले तेव्हा नागरिकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. या रोड शोमुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. विशेषतः तरुणाईची तुफान गर्दी उसळली होती. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले हे शक्तीप्रदर्शन पोटनिवडणुकीत लक्षवेधी ठरले.

मुख्यमंत्र्यांसोबत रोड शोमध्ये भाजपा-शिवसेना आणि मित्र पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते. भाजपा व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार भरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजपा प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्यासह भाजपा, शिवसेना व मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ajit Pawar On Navneet Rana
“नवनीत राणा यांच्या विजयासाठी…”; उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले?
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ठाकरे गटाने…”

हेही वाचा – “मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांना देण्यास शरद पवारांचा विरोध होता”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

मुख्यमंत्री वाकड येथील दत्त मंदिराजवळील उत्कर्ष चौकात येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोड शोला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोनिमित्त महायुतीच्या वतीने संपूर्ण मार्ग भगवामय झाला होता. त्यांच्या रोड शोला तुफान गर्दी उसळली होती. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. रोड शोच्या मार्गावर नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. रस्त्याने ठिकठिकाणी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत होता. भाजपाच्या विजयाच्या, महायुतीच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शोच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. मुख्यमंत्रीही कधी हात उंचावून, तर कधी हात जोडून मतदारांना अभिवादन करताना दिसत होते.