scorecardresearch

इंदापूर: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अफूची लागवड; एक कोटी ४१ लाखांची सात टन अफूची बोंडे जप्त

पुणे शहराजवळ असलेल्या होळकरवाडीत गव्हाच्या शेतीत अफुची लागवड केल्याची घटना ताजी असताना इंदापूरमध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अफुची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

pune

पुणे शहराजवळ असलेल्या होळकरवाडीत गव्हाच्या शेतीत अफुची लागवड केल्याची घटना ताजी असताना इंदापूरमध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अफुची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेवजवळ माळेवाडी गावात पोलिसांनी कारवाई करुन एक कोटी ४१ लाख ७४ हजार रुपयांची सात टन अफुची बोंडे जप्त केली. या प्रकरणी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी काशीनाथ रामभाऊ बनसोडे, माधव मोतीराम बनसोडे, लक्ष्मण सदाशिव बनसोडे, दत्तात्रय मारुती शेलार, राजाराम दगडू शेलार, रामदास जगन्नाथ शिंदे (सर्व रा. माळेवाडी, ता. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. उजनी धरणाच्या पाणलाेट क्षेज्ञाजवळ अफुची लागवड करण्यात आली होती. अफुची झाडे दिसू नये म्हणून आरोपींनी लागवड क्षेत्राजवळ मका लावलेल्याचे आढळून आले. मक्यामुळे अफुची झाडे दिस नव्हती. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अफुची लागवड करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अफुची लागवड करण्यात आल्यााने पोलीस अधिकारी चक्रावून गेले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त आयुक्त आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, महसूल विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी या कारवाईत सहभागी झाले. या कारवाईत सात टन अफुची बोंडे जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश माने तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 21:33 IST
ताज्या बातम्या