पुणे : घटस्फोट झाल्यानंतर पुनर्विवाह करण्याच्या उद्देशातून समाज माध्यमावर जाहिरात करणे ६० वर्षांच्या ज्येष्ठाला अंगलट आले. सायबर चोरट्यांनी त्यांच्याच साथीदार महिलेला पुढे करून आर्थिंक फसवणुकीचा डाव टाकल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी महिलेच्या मागणीनुसार ज्येष्ठाने तिला पाठविलेले चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देत सायबर चोरट्यांनी त्यांची ७२ हजारांची फसवणूक केली.  याप्रकरणी कर्वेनगरमधील ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचा घटस्फोट झाला आहे. पुर्नविवाह करण्याच्या उद्देशातून त्यांनी समाज माध्यमावर जाहिरातीद्वारे इच्छा प्रदर्शित केली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी प्रतिसाद देत पाठविलेला अर्ज फिर्यादीने माहिती भरून पाठविला, त्यानंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांना संपर्क करून लघुसंदेशाद्वारे लग्नाचे आमिष दाखवले. त्यांच्यात व्हॉटसअ‍ॅपवर बोलणे सुरू झाले. त्यातून ज्येष्ठाला अश्लिल चित्रीकरण तयार करायला भाग पाडले. हे चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन तिने बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur Crime News
Nagpur Crime : विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक, मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ
Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा

हेही वाचा >>>पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती

विक्रम राठोड याने तक्रारदाराला दूरध्वनी तसेच लघुसंदेशाद्वारे संपर्क केला. दिल्लीच्या सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन सेल येथे गुन्हा दाखल असल्याची भीती घातली. त्याने राहुल शर्मा याच्याशी संपर्क साधावा, असे सांगितले. अन्यथा यु ट्युबवर तुमचे चित्रीकरण प्रसारित करतो, अशी धमकी दिली. त्यानुसार तक्रारदार ज्येष्ठाने आरोपी राहुल शर्माला संपर्क केल्यानंतर त्याने  ७२ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

Story img Loader