दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव स्पर्धेत भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळांस प्रथम क्रमांक

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते

दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव स्पर्धेत भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळांस प्रथम क्रमांक
माजी महापौर मंगला कदम, माजी उपमहापौर कैलास भांबुर्डेकर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, प्रसाद शेट्टी, महादू गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी आदी उपस्थित होते.

पिंपरी: भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व गणेशोत्सव एकाच वेळी आला आहे. दोन वर्षे आपण घरात बसलो आहोत. पण यंदाचा उत्सव आनंदात, जल्लोषात साजरा करायला हवा, असे मत पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पिंपरी-चिंचवडसाठी आयोजित गणेशोत्सव स्पर्धा २०१९ चे पारितोषिक वितरण आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडले, तेव्हा त्या बोलत होत्या. माजी महापौर मंगला कदम, माजी उपमहापौर कैलास भांबुर्डेकर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, प्रसाद शेट्टी, महादू गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी आदी उपस्थित होते.

मंगला कदम म्हणाल्या, मंडळांच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल करू नका, तरुणाईला विधायक कामांसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. अनेक आरोग्यविषयक समस्या आपल्यासमोर आहेत, त्यावर मात करीत जनजागृती करण्याचे काम मंडळानी करावे. मंचक इप्पर म्हणाले, उत्सवी काळात पोलिसांची गरज पडू नये, याकरता काळजी व संयम गरजेचा आहे. आपल्या आनंदाचा इतरांना त्रास होता कामा नये, याची खबरदारी घ्यावी.

प्रास्तविक महेश सूर्यवंशी यांनी केले. संतोष ढोरे यांनी सूत्रसंचालन केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या बस टर्मिनलचा सात वर्षांपासून वापरच नाही ; भाजप आमदारांची पीएमपीच्या कारभाराविषयी तक्रार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी