जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आठ तालुक्यांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून ८३ घरांची पडझड झाली आहे. याशिवाय एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून रस्ते, बंधारे वाहून गेले आहेत. तसेच नऊ जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली असून तब्बल २० हजार कोंबड्या दगावल्या आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध सरपंच पदाच्या ५५ जागांसाठी २१० जण रिंगणात

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर
500 houses collapsed in two days due to unseasonal rain in Yavatmal woman died due to lightning
यवतमाळात अवकाळीने दाणदाण; दोन दिवसांत ५०० घरांची पडझड, वीज कोसळून महिलेचा मृत्यू, तिघे गंभीर
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ४१ घरांची पडझड झाली असून दोन शेळ्या, एक बोकड, आठ हजार कोंबड्या दगावल्या आहेत. तसेच १०२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मोरगावमधील खटकळी ओढ्यावरील बंधारा वाहून गेला आहे. जुन्नर तालुक्यात सहा घरांची पडझड झाली असून सोमतवाडी येथे पाच हजार कोंबड्या, ओतूर येथे ६६०० आणि पिंपरी पेंढार येथे १२७५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वेल्हा तालुक्यात २६ घरांची पडझड झाली असून एक जनावर दगावले आहे. खेड तालुक्यात तीन घरांची पडझड झाली असून पुरंदर तालुक्यात सात घरांचे नुकसान झाले आहे. तसेच तीन शेळ्या, दोन जनावरे आणि ४००० कोंबड्या दगावल्या आहेत. या ठिकाणी १०७ हेक्टर, तर दौंड तालुक्यात १५२ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> पिंपरी : शिरूर लोकसभेतील प्रलंबित प्रश्न सोडवू ; केंद्रीयमंत्री रेणूका सिंह यांची ग्वाही

जिल्ह्यात १, ६ आणि ७ सप्टेंबर या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. जुन्नर तालुक्यातील आठ मंडळे, आंबेगाव, दौंड प्रत्येकी एक मंडळ, पुरंदर आणि मावळ प्रत्येकी तीन मंडळे, खेड सहा मंडळे, बारामती एक, तर इंदापूर दोन मंडळ अशा एकूण १०० मंडळांपैकी २५ मंडळांमध्ये जास्त पाऊस झाला आहे. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १८२ घरांचे नुकसान झाले असून दहा घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच ५३१४ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून लवकरच राज्य सरकारकडे भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. – संजय तेली, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी