औंध परिसरात भरदिवसा घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लांबविला

औंध परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ४१ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली.

( संग्रहित छायचित्र )

पुणे : औंध परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ४१ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली.

याबाबत सुनीता मोरे (वय ३७, रा. औंध ) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. औंध परिसरात भैरवनाथ मंदिरासमोर असलेल्या इमारतीत मोरे यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतली आहे.

मोरे सकाळी दहाच्या सुमारास सदनिका बंद करुन कामानिमित्त बाहेर पडल्या. अर्ध्या तासाने त्या घरी परतल्या. तेव्हा सदनिकेचा दरवाजा उचकटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी कपाट उचकटून सोन्याचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. झरेकर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daytime burglary in oindh area looted rs 2 5 lakh pune print news amy

Next Story
महाविद्यालयीन तरुणाचा मोबाइल संच हिसकावणारे चोरटे गजाआड ; मालधक्का चौकातील घटना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी