खळबळजनक : पुण्यात भरदिवसा गोळीबार ; काँग्रेस पदाधिकाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू!

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडला थरार

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

पुण्यातील भारती पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. समीर मुनीर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास समीर हा भारती पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील एकाने पिस्तूलमधून समीरवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये समीरखाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. तर या हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. हत्या झालेला तरूण काँग्रेस पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे, असे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daytime firing in pune congress office bearer dies on the spot msr 87 svk

ताज्या बातम्या