महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील ५९१५ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (४ फेब्रुवारी) होती. मात्र, यंदा अर्ज करतानाच सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही कागदपत्रे मिळण्यास नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींना देखील अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर म्हाडाने घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर घरांची सोडत ७ मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे.

म्हाडा सोडतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी (३१ जानेवारी) घेण्यात आला होता. याबाबतची बातमी ‘लोकसत्ता’ने १ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार म्हाडाच्या पुणे मंडळाने शुक्रवारी घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. म्हाडाच्या विविध योजनेतील २५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २९९० सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३९६ सदनिका अशा एकूण ५९१५ सदनिकांसाठी सोडत होत आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्यअंतर्गत २९२५ घरे उपलब्ध आहेत. यंदा प्रथमच अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तसेच आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या अर्जांची छाननीदेखील ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे विविध प्रमाणपत्र जमा करण्यासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. काहींना अर्ज करूनही अजून प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

हेही वाचा – निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करणार – देवेंद्र फडणवीस

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शैलेश टिळक यांची भेट; बंद दरवाज्या आड चर्चेने तर्कवितर्कांना उधाण

सोडतीचे सुधारित वेळापत्रक

ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी
अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत २७ फेब्रुवारी
सोडतीसाठी अंतिम अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध ३ मार्च
सोडतीसाठी अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध ५ मार्च
सोडत जाहीर ७ मार्च