नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | death biker collision with truck in ahmednagar pune road pune | Loksatta

पुणे-नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
(प्रतिनिधिक छायाचित्र)

पुणे : नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याकुब खलील अन्सारी (वय ३८, रा. भावडी रोड, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याकुबचे काका निजामुद्दीन अन्सारी (वय ४९, रा. वडगाव शिंदे रस्ता, लोहगाव) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार याकुब अन्सारी नगर रस्त्यावरुन सकाळी दहाच्या सुमारास निघाले होते. वाघोली परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार याकुब यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या याकुब यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी एस. बी. तिकोणे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार ; तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या

राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांचा…”
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
पुणे: हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याच्या संचालकांना दिल्ली पोलिसांची नोटिस
पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार ; तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन