Death of Gaur in Katraj Zoological Museum pune | Loksatta

X

पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू

गव्याचे वजन काही दिवसांपासून अचानक कमी व्हायला सुरवात झाली होती. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली उपचार सुरू होते.

पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू
(संग्रहित छायाचित्र)

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील गव्याचा गुरुवारी मृत्यू झाला. गव्याची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. मृत्यू झालेल्या गव्याचे वय पंधरा वर्षांचे होते. आता प्राणी संग्रहालयातील गव्यांची संख्या दोन झाली आहे.

हेही वाचा- पुणे: एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी; ४४२ महाविद्यालयात खास शिबिरे

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयील हा गवा पाच वर्षांचा असताना प्राणीसंग्रहालयात आणण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून गव्याची प्रकृती चिंताजनक होती. गव्याचे वजन काही दिवसांपासून अचानक कमी व्हायला सुरवात झाली. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली उपचार सुरू होते. मात्र, त्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख राजकुमार जाधव यांनी दिली.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरचे पाच रूग्ण; खबरदारी बाळगण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

प्राणी संग्रहालयाने केरळमधील तिरुअनंतपुरम येथून काही दिवसांपूर्वी दोन गवे आणले आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील गव्यांची संख्या तीन झाली होती. आता या गव्याच्या निधनाने प्राणी संग्रहालयातील गव्यांची संख्या दोन झाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 21:31 IST
Next Story
पुणे: एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी; ४४२ महाविद्यालयात खास शिबिरे