पुणे : ‘मागोवा’ व ‘तात्पर्य’ या मासिकाचे संपादक आणि प्रसिद्ध मार्क्‍सवादी विचारवंत-लेखक सुधीर बेडेकर (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय डॉ. दि. के. बेडेकर यांचे सुधीर हे पुत्र होत. त्यांच्यामागे पुत्र प्रा. निस्सीम बेडेकर आहेत. सुधीर बेडेकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुद्धिमान मार्क्‍सवादी विचारवंत म्हणून सुधीर बेडेकर सत्तरीच्या दशकात महाराष्ट्राला परिचित झाले. कार्ल मार्क्‍सच्या ‘इकॉनॉमिक आणि फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट’ या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील काही उच्चशिक्षित तरुणांनी ‘मागोवा’ या मार्क्‍सवादी गटाची स्थापना केली. त्याचे नेतृत्व सुधीर बेडेकर करत होते. बेडेकर यांनी मुंबई आय. आय. टी. येथून इलेक्ट्रिकल विषयातील बी. टेक. पदवी प्राप्त केली होती. त्यांच्यासारखेच अभियंते, शास्त्रज्ञ, लेखक, चित्रकार आणि कित्येक विद्यार्थी मागोवात सामील झाले. त्यातूनच कुमार शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली शहादा चळवळ उभी राहिली. आदिवासींना समाजवादी क्रांतीचे पाईक करण्यासाठी लागणारी वैचारिक रसद प्रामुख्याने बेडेकर यांनी पुरवली.या गटाने सुरू केलेल्या ‘मागोवा’ मासिकाचे सुधीर बेडेकर संस्थापक संपादक होते. महाराष्ट्रात या मासिकाने स्वत:चा खास वाचकवर्ग निर्माण केला. आणीबाणीनंतर बदललेल्या परिस्थितीत मागोवाचे एक राजकीय गट म्हणून कामकाज थांबले आणि मागोवा मासिकाचे प्रकाशनही थांबले. परंतु सुधीर बेडेकर यांनी गं. बा. सरदार, नलिनी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ‘तात्पर्य’ हे वैचारिक मासिक दशकभर मोठय़ा निष्ठेने चालवले.

Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
Hemant Dhome : राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Vakrangee Technology, Dinesh Nandwana Death ,
मुंबई : ईडीची निवासस्थानी शोधमोहीम सुरू असताना व्यावसायिकाचा मृत्यू
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Marotrao Gadkari passed away, Senior Gandhian thinker, Marotrao Gadkari , Marotrao Gadkari news,
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन, विनोबाजींच्या भूदानयज्ञात त्यांनी…
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ
veer pahariya on bonding with Janhvi Kapoor GF of shikhar pahariya
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर, भावाच्या गर्लफ्रेंडबद्दल वीर पहारिया म्हणाला…
writer dr ashok kamat passes away at age of 83
डॉ. अशोक कामत यांचे निधन

‘कला, विज्ञान आणि क्रांती’, ‘हजार हातांचा ऑक्टोपस’ या पुस्तकांतून बेडेकर यांनी मार्क्‍सवादी सिद्धांत आणि सौंदर्यशास्त्र, तसेच भारतीय समाजव्यवस्थेची समीक्षात्मक मांडणी केली. मार्क्‍सवादातील सिद्धांत सोप्या भाषेत सांगण्याच्या वैशिष्टय़ामुळे अनेक शिबिरांत आणि अभ्यास मंडळात त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी मार्गदर्शन केले. १९८० नंतर बेडेकर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. आयुष्याच्या अखेपर्यंत ते पक्षाचे सहप्रवासी राहिले.

साप्ताहिक ‘जीवन मार्ग’चे वाचन करून ते आस्थेने सूचना देत. आवडलेल्या लेखनाचे स्वागत आणि प्रसंगी सौम्य शब्दात मतभेदही व्यक्त करत. आयुष्याच्या अखेपर्यंत त्यांनी समाजविज्ञान अकादमीचे विश्वस्त म्हणून काम केले. अकादमीच्या भगतसिंग सभागृह आणि वाचनालय उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. अलीकडेच त्यांच्या पत्नी,  ‘जीवन मार्ग’ व जनशक्ती प्रकाशनच्या लेखिका चित्रा बेडेकर यांचे निधन झाले होते. काही महिन्यांपूर्वी सुधीर बेडेकर यांनी दि. के. बेडेकर यांच्या अप्रकाशित साहित्याचा संग्रह प्रकाशित केला होता.

Story img Loader