भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज परिसरात घडली. अनिकेत दिवाणजी धावले (वय २२, रा. भिलारेवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अपघातात अनिकेतचा भाऊ आकाश (वय २४) जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाशने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अनिकेत आणि त्याचा भाऊ आकाश भोरमधील तेलवर्डी गावाकडे निघाले होते. पुणे-सातारा रस्त्यावरील मांगडेवाडी परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेला अनिकेतचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून सहायक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.