नदीपात्रातील शिवणे-खराडी रस्त्याला भूसंपादनाचा अडथळा

पुणे : शहराच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडण्यासाठी उपुयक्त ठरणारा नदीपात्रातील शिवणे-खराडी रस्ता भूसंपादनाअभावी अद्यापही रखडला असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.  भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून तो मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांपुढे ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत किमान चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. दशकपूर्तीनंतर रस्ता अधर्वट झाला असून रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने आतापर्यंत कोटय़वधींची उधळपट्टी केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत शहराच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडण्यासाठी काही वर्षांपूर्वी नदीपात्रातून शिवणे-खराडी रस्ता प्रस्तावित करण्यात आला. या रस्त्याचे काम २०११ मध्ये सुरू झाले. एकूण १८ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीवर मात्रा म्हणून शिवणे ते खराडी रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाच्या वतीने ३०७ कोटी ४४ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्र तयार करण्यात आले होते. त्यानंतर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. पहिल्या तीन वर्षांमध्ये भूसंपादन आणि पर्यावरणाच्या प्रश्नांमुळे अडथळे निर्माण झाल्याने काम पुढे सरकलेच नाही. त्यामुळे मे २०१४ मध्ये कामाला भाववाढ सूत्रानुसार दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही कामाने गती घेतली नाही. ही मुदत संपल्यानंतरही मे २०१६ मध्ये कामाला मे २०१८ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही पुन्हा कामाला मुदतवाढ देण्यात आली. सध्या अठरा किलोमीटर पैकी जेमतेम ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.  दहा वर्षांपूर्वी  रस्त्याची आखणी करताना म्हात्रे पुलाखालून नदीपात्रातील रस्त्यावरून संचेती रुग्णालयावरून, इंजिनियिरग कॉलेज मार्गे संगमवाडी ते बिंदूमाधव ठाकरे चौक ते खराडी अशी  रस्त्याची आखणी होती.  त्या वेळी भूसंपादनाचा विचार करण्यात आला नाही. सध्या कर्वेनगर मध्ये महालक्ष्मी लॉन्स येथपर्यंत रस्त्याचे काम आले आहे. तर राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यान जागा ताब्यात न आल्याने काम अपूर्णावस्थेत असल्याची कबुली महापालिकेच्या पथ विभागाने दिली आहे. म्हात्रे पुलाखालून रस्ता नदीपात्रातील रस्त्याला जोडण्याबाबतही संभ्रमावस्था आहे.

सहा महिन्यांची मुदतवाढ

भूसंपादनाचे काम रखडल्याने ठेकेदारास पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र दहा वर्षांत जे काम होऊ शकले नाही ते सहा महिन्यात पूर्ण होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. क्रिएटिव्ह फौउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनीही रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. रस्त्याबाबतीत सर्व स्तरांवर बैठका, प्रत्यक्ष पाहणी, जागामालकांसोबत पाहणी असे सर्व सोपस्कार वेळोवेळी पूर्ण करून हे काम मात्र अपूर्ण असल्याचे विदारक चित्र असल्याचे या निवेदनात खर्डेकर यांनी नमूद केले आहे.

३६ मीटर रुंदीचा रस्ता

म्हात्रे पूल ते राजाराम पूल हा रस्ता ३६ मीटरच रुंद असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शिवणे ते लभडे फार्म २४ मीटर, लभडे फार्म ते म्हात्रे पूल ३० मीटर, संगमवाडी ते येरवडा ३० मीटर आणि येरवडा ते खराडी २४ मीटर रुंद अशीच प्रत्यक्षात आखणी करण्यात आली आहे .त्यामुळे हा रस्ता भविष्यात जेव्हा कधी होईल तेव्हा त्याची रुंदी किती असेल याबाबत संभ्रमावस्था आहे. नदीपात्रातील रस्त्यालगत जागा मालकाने पत्रे लावले आहेत. त्याबाबतही महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याची तक्रार संदीप खर्डेकर यांनी केली आहे.