अत्याधुनिक डबे, खवय्यांसाठी वातानुकूलित विभाग; जून महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत

पुणे : पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेने दररोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांची लाडकी गाडी समजली जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस अर्थात दख्खनच्या राणीचे रुपडे लवकरच पालटणार आहे. गाडीला एचएचबी प्रकारातील अत्याधुनिक आणि नव्या रंगसंगतीचे डबे जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबरच खवय्या प्रवाशांसाठी नव्या रचनेची वातानुकूलित डायिनग कारही सोबतीला असणार आहे. पुणे-मुंबई प्रवासासाठी दररोज धावणारी सर्वात पहिली आणि अल्पावधीत प्रवाशांची लाडकी झालेली डेक्कन क्वीन आतापर्यंत सात ते आठ नवनव्या रंगसंगतीत प्रवाशांसमोर आली आहे. या गाडीचे रुपडे अनेकदा बदलले असले, तरी प्रवाशांचे प्रेम मात्र कमी होऊ शकले नाही. गाडीप्रमाणेच तिची डायिनग कार आणि त्यात मिळणारे पदार्थही प्रसिद्ध आहेत. डेक्कन क्वीनला आता पुन्हा नवे रूपडे लाभणार असल्याने प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

९३ व्या वर्षांत पदार्पण..

पुणे-मुंबई प्रवासासाठी १ जून १९३० रोजी सुरू करण्यात आलेली डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज नोकरदार, व्यापारी, वकील, मंत्रालयीन अधिकारी आदींची पुणे-मुंबई प्रवासात दररोजची सोबती झाली आहे. त्यामुळे या गाडीबाबत प्रवाशांना विशेष प्रेम आहे. या गाडीची लिम्का बुकमध्येही नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे तिला ‘आयएसओ’ हे गुणवत्तेचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. प्रवाशांच्या वतीने १ जूनला दरवर्षी केक कापून गाडीचा वाढदिवसही साजरा केला जातो. प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा त्यासाठी पुढाकार घेतात. यंदा १ जूनला गाडी ९३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. हाही वाढदिवस साजरा होणार आहे. त्यामुळे गाडीला नवे रुपडे १ जूनपासून मिळावे, अशी मागणी शहा यांनी केली आहे.

नवे काय?

गाडीला एलएचबी प्रकारातील अत्याधुनिक नवे डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गाडीतील प्रवास आणखी आरामदायक होऊ शकेल. गाडीला जोडण्यात येणारे डबे गेल्याच महिन्यात चेन्नईतील कारखान्यातून पुणेमार्गे मुंबईत नेण्यात आले आहेत.

कधीपासून?

सुधारित रचनेसह ही गाडी २२ जूनपासून मुंबई येथून, तर २३ जूनपासून पुणे स्थानकातून सोडण्यात येणार आहे. संपूर्ण गाडीला चार वातानुकूलित आसनयान, आठ द्वितीय श्रेणी आसनयान, एक गार्डस ब्रेक, तर एक जनरेटर कार असे डबे असणार आहेत. पारदर्शी प्रवासाचा आणि प्रवासात निसर्गाची अनुभूती देणारा व्हिस्टाडोम डबा कायम ठेवण्यात येणार आहे.