scorecardresearch

पुणे : मिळकत कर भरण्याची शेवटची संधी; क्षेत्रीय कायार्लये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय

मिळकतकर भरण्याचा शनिवार शेवटचा दिवस आहे. या मुदतीनंतर थकबाकीवर दरमहा दोन टक्के दंड आकारला जाणार आहे.

पुणे : मिळकत कर भरण्याची शेवटची संधी; क्षेत्रीय कायार्लये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय
पुणे महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)

चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीतील मिळकतकर भरण्यासाठी शनिवारी अंतिम संधी आहे. त्यासाठी शनिवारी सुटीच्या दिवशीही सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने घेतला आहे. या मुदतीनंतर थकबाकीवर दरमहा दोन टक्के दंड आकारला जाणार आहे.

हेही वाचा- पिंपरी प्राधिकरणातील भूमिपुत्रांना १५ दिवसांत जमीन परतावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीची मिळकतकर देयके मार्च महिन्यात पाठविण्यात आली होती. वार्षिक देयकाची दोन सहामाहीत विभागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पहिली सहामाही १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ तर दुसरी सहामाही १ ऑक्टोबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. पहिल्या सहामाहीस एक जुलैपासून २ टक्के दराने दरमहा दंड आकारला जात आहे. द्वितीय सहामाहीस १ जानेवारी २०२३ पासून दोन टक्के दराने दरमहा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीसह मिळकतकर भरण्यासाठी शनिवार शेवटची मुदत आहे. मिळकतकरधारकांना मिळकतकर भरण्यासाठी शनिवारी सुटीच्या दिवशी सर्व नागरी सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये सकाळी दहा ते सायंकाळी चारपर्यंत सुरू राहणार आहेत. रोख स्वरूपात, चेक, डीडीद्वारे करभरणा करता येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 21:30 IST

संबंधित बातम्या