पुणे : नवरात्रोत्सवात नव्या नारळाला मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दीड ते दोन लाख नारळांची आवक सध्या होत आहे. नवरात्रोत्सवात भाविकांकडून तोरण वाहिले जाते. तोरणासाठी नव्या नारळाचा वापर केला जातो. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून नारळाची आवक मार्केट यार्डातील भुसार बाजारात होते. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात नारळांच्या मागणीत वाढ होते. नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरात तोरण वाहण्याची प्रथा आहे. उपवासाचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी नारळाला मागणी वाढते, असे मार्केट यार्डातील नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी सांंगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त; राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंदच

हेही वाचा >>> ‘बेस्ट’ची विजेवर धावणारी वातानुकूलित दुमजली बस लवकरच; पुण्यात चाचणी सुरू

नव्या नारळाचा वापर तोरण वाहण्यासाठी केला जातो. घरगुती वापरासाठी पालकोल नारळाचा वापर केला जातो. उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळांचा वापर केला जातो. केटरिंग तसेच उपाहारगृह चालकांकडून मद्रास जातीच्या नारळांना मागणी असते. उपाहारगृहचालकांकडून मद्रास आणि सापसोल नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीत वाढ झाली असली तरी, नारळाची आवक चांगली होत आहे. नारळाचे दर स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. तोरणासाठी नवा नारळ वापरला जातो. तामिळनाडूतून नव्या नारळाची आवक होत आहे. कर्नाटकातून मद्रास आणि सापसोल जातीच्या नारळांची आवक होत आहे. आंध्र प्रदेशातून पालकोल जातीच्या नारळांची आवक होत आहे.

हेही वाचा >>> शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धेला मराठीचे वावडे!

दसऱ्याला नारळाच्या मागणीत वाढ

गेले दोन वर्ष करोना संसर्गामुळे सर्व प्रकारचे उत्सव, सणांवर निर्बंध होते. निर्बंधामुळे नारळाला मागणीत घट झाली होती. यंदा नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नाराळाची किंमत २५ ते ४० रुपये दरम्यान आहे. येत्या बुधवारी (५ ऑक्टोबर) दसरा आहे. दसऱ्याला नारळाच्या मागणीत आणखी वाढ होईल, असे नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी नमूद केले.

शेकडा नारळाचे घाऊक बाजारातील दर

नवा नारळ – १२५० ते १४५० रुपये

पालकोल- १४५० ते १५५० रुपये

सापसोल- १७०० ते २४०० रुपये

मद्रास- २४०० ते २६०० रुपये

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand coconuts during navratri festival coconuts per day icrease pune print news ysh
First published on: 02-10-2022 at 10:20 IST