पुणे :  यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यातीला डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरुवात झाली आहे. आखाती देश, लहान युरोपियन देश आणि चीनला निर्यात सुरू आहे. साधारण पंधरा जानेवारीनंतर नाशिक परिसरातून अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांना होणारी निर्यात गती घेईल.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसरातून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून आखाती देशांना निर्यात सुरू आहे. बारामती जवळच्या बोरी भागातून काळय़ा द्राक्षांची निर्यात चीनला सुरू झाली आहे. युरोपातील हॉलंडसारख्या लहान देशांनाही निर्यात सुरू झाली आहे.काळय़ा रंगाच्या द्राक्षांना शेतकऱ्यांना प्रतिकिलो १४० रुपये, तर हिरव्या रंगाच्या द्राक्षांना प्रतिकिलो ७५ ते ८५ रुपये मिळत आहेत. चीनची बाजारपेठ आपल्या द्राक्षांसाठी सध्यातरी खुली आहे. भविष्यात करोनाचे संकट वाढल्यास काही प्रमाणात निर्जंबध येण्याची भीती आहे.

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

जानेवारीअखेरीस निर्यातीला गती

जानेवारी महिन्याच्या अखेरीस निर्यातीला गती येणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक, त्यानंतर सांगली, पुणे, सोलापूर परिसरातील हिरव्या द्राक्षांची निर्यात सुरू होईल. ही द्राक्षे प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपातील प्रमुख देशांना जातील, अशी माहिती शिवाजी पवार यांनी दिली.

३५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

देशातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीसाठी मागील वर्षी ४४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदा एकूण ३५,१५३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जानेवारी अखेर नोंदणी सुरू राहणार असल्यामुळे, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एकूण ३५,१५३ त्यापैकी महाराष्ट्रातून ३५०८२, तर कर्नाटकातून ७१ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. राज्यात ६८४ शेतकऱ्यांनी नव्याने नोंद केली आहे. 

नाशिकमधून २१,८५८ तर सांगलीतून ८,९२९ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. नाशिक परिसरातून नेदरलॅड, हॉलंडसह आखाती देशांना निर्यात सुरू झाली आहे. मागील वर्षी फक्त युरोपला २ लाख ६१ हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती. त्यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे.

गोविंद हांडे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग