जुने पुणे- मुंबई महामार्गावरील सोमाटना टोल नाका हटवण्यासाठी मावळकर आक्रमक झाले आहेत. सोमाटने टोल नाका हटाव कृती समिती अधिक आक्रमक झाली असून आज तळेगाव बंद ची हाक त्यांनी दिली होती. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असून तळेगावकरांनी बंद ला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे.

पुणे- मुंबई या जुन्या महामार्गावर सोमाटने फाटा येथे टोल नाका असून तो हटवण्याची मागणी सोमाटने टोल हटाव कृती समितीने केली आहे. याअगोदर ही अनेकदा आंदोलन करून टोल हटवण्याची मागणी या कृती समितीने केली. परंतु, आता थेट इशारा देत तळेगाव बंदची हाक देण्यात आली होती. त्या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद तळेगावकारांनी दिला असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सोमाटने टोल नाका हटवण्याची मागणी संबंधित कृती समिती करत आहे.

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
navi mumbai, palm beach road
नवी मुंबई: पामबीच मार्गावर वाहतूक संथगतीने

आणखी वाचा- पुणे: पुढील दहा महिने रेल्वे प्रवाशांसाठी खडतर

सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचं काम आयआरबी करत असून तो टोल नाका हटवावा अशी मागणी सोमाटने टोल नाका कृती समितीने केली आहे. जुना पुणे- मुंबई महामार्गावरून लाखो वाहने ये- जा करत असतात. तळेगाव एमआयडीसीत पिंपरी- चिंचवड, पुणे आणि देहूरोड येथील शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. त्यांना दररोजच टोल नाक्याच्या अरेरावीला सामोरे जावे लागते असा आरोप संबंधित कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे. टोल हटावची मागणी पूर्ण न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील सदस्यांनी दिला आहे.