दिवाळीसाठी सुकामेव्याला मागणी ; आवक वाढल्यामुळे सुकामेव्याच्या दरात १० ते २५ टक्क्यांपर्यंत घट

फराळात सुकामेव्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. त्यामुळे दिवाळीत सुकामेव्याच्या मागणीत मोठी वाढ होते.

पुणे : आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुकामेव्याच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. आप्तेष्ट, परिचितांना सुकामेवा भेट देण्याचे प्रमाण वाढले असून मार्केटयार्डातील घाऊक बाजारात सुकामेव्याची आवकही वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिकिलो सुकामेव्याच्या दरात १० ते २५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याची माहिती सुकामेवा व्यापाऱ्यांनी दिली.

दिवाळीनिमित्त मिठाईची भेट दिली जाते. त्याबरोबरच सुकामेवा भेट देण्याचे प्रमाण वाढते आहे. अनेक खासगी कंपन्यांमधील कर्मचारी तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुकामेवा भेट दिला जातो. यंदा सुकामेव्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुकामेव्याच्या दरात किलोमागे १५ ते २५ टक्कयांपर्यंत घट झाली असल्याची माहिती मार्केटयार्ड भुसार बाजारातील सुकामेवा व्यापारी विनोद गोयल यांनी दिली.

फराळात सुकामेव्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. त्यामुळे दिवाळीत सुकामेव्याच्या मागणीत मोठी वाढ होते. बाजारात काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे तसेच अन्य सुकामेव्याची दररोज दोन ट्रक एवढी आवक होत आहे. गोवा, बेळगावमधून काजू, सांगली, तासगाव, विजापूर, पंढरपूर परिसरातून बेदाणे, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून जर्दाळू आणि सुके अंजीर, अमेरिकेतील कॅलेफोर्निया, ऑस्ट्रेलियातून बदाम, इराणमधून पिस्ता, मध्यप्रदेश आणि ओदीशातून चारोळीची आवक होत आहे. सुकामेव्याची आवक वाढली असल्याने यंदा सुकामेवा स्वस्त झाला असल्याचे गोयल यांनी सांगितले.

सुकामेव्याचे एक किलोचे दर

सुकामेवा प्रकार              २०२०            २०२१

बदाम               ८०० ते ८५० रुपये            ६२० रुपये

खारा पिस्ता           ९५० ते ११०० रुपये      ८५० रुपये

अक्रोड               ७०० ते १००० रुपये       ७०० ते १००० रुपये

काजू                ७०० ते ११०० रुपये      ६७० ते ९०० रुपये

अंजीर               ९०० ते १४०० रुपये      ७०० ते १००० रुपये

जर्दाळू             ३०० ते ५०० रुपये       ३०० ते ५०० रुपये

मनुके               २०० ते ३०० रुपये        २०० ते ३०० रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Demand increased for dried fruits in diwali zws

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले