महापालिकेच्या वतीने आयोजित मासिक लोकशाही दिनामध्ये प्रश्नांची सोडवणूक होण्याऐवजी टोलवाटोलवी केली जात असल्याचा अनुभव नागरिकांना येत असतानाच आता महापालिका प्रशासनाने बदललेल्या पद्धतीचा फटकाही लोकशाही दिनाला बसला आहे. बदललेल्या पद्धतीची आणि तक्रार कशी करावी, याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याने तक्रारींची संख्या कमी कमी होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: शहरातील फलकबाजीविरोधात ‘पीपीसीआर’तर्फे ‘नो फ्लेक्स’ मोहीम

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

राज्य शासनाच्या आदेशानुसार गेल्या वीस वर्षांपासून महापालिका आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये नागरिक त्यांचे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये न सुटणारे प्रश्न मांडून प्रश्नांची तड लावण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक वर्षे या मासिक लोकशाही दिनात काही डझन नागरिक सहभागी होत होते. मात्र, प्रश्नांची सोडवणूक होण्याऐवजी टोलवाटोलवीचे अनुभव नागरिकांना येऊ लागल्याने नागरिकांचा उत्साह कमी होऊ लागला होता. त्यातच सन २०१७ साली तत्कालीन महापालिका आयुक्तांनी लोकशाही दिन दोन टप्प्यांत राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तक्रार प्रथम महापालिकेच्या परिमंडळ कार्यालयात नोंदविण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली. या तक्रारींच्या निवारणासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यास सुरूवात झाली. परिमंडळ स्तरावरील लोकशाही दिनात समाधान न झाल्यास नागरिकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयुक्त कार्यालयात होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याबाबात सांगण्यात आले. ही बदललेली प्रक्रिया नागरिकांपर्यंत पोचलीच नाही. त्यामुळे तक्रारींची संख्या कमी होत असल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांना यासंदर्भातील माहिती मिळाली आहे.

हेही वाचा >>>पुणे: पाळीव श्वान भुंकल्याने वाद; महिलेला शिवीगाळ करुन धमकी

करोना संकटामुळे जवळपास दीड वर्ष लोकशाही दिन आयोजित करण्यात आला नव्हता. गेल्या वर्षभरापासून लोकशाही दिनाचे पुन्हा आयोजन सुरू झाले. सोमवारच्या माहिती अधिकार दिनात गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला आयोजित केलेल्या परिमंडळ कार्यालयात; तसेच महापालिका आयुक्त कार्यालयातील लोकशाही दिनात किती तक्रारी आल्या, याची माहिती वेलणकर यांनी घेतली. परिमंडळ २,३ आणि ४ या तीन ठिकाणी एकही तक्रार वर्षभरात लोकशाही दिनात आली नाही. तर परिमंडळ ५ मधे १४ महिन्यांत फक्त ९ तक्रारी प्रशासनाकडे आल्या. महापालिका आयुक्त कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात १४ महिन्यांत मिळून फक्त ७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा >>>जलतरण तलावांतील दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करा; लोणावळ्यातील बंगले मालकांच्या बैठकीत पोलिसांचे आदेश

तक्रारींची संख्या कमी झाल्याने नागरिकांच्या तक्रारी संपल्या आहेत, असे नाही. तर लोकशाही दिनात तक्रार कशा प्रकारे करावी, याची माहितीच नागरिकांना नाही. याची परिपूर्ण माहिती देणारे ठळक फलक ना परिमंडळ कार्यालयात आहेत ना महापालिकेच्या मुख्य इमारतीत आहेत. देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या महापालिकेच्या संकेतस्थळावरही माहिती ठळकपणे प्रसिद्ध केलेली दिसून येत नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोकशाही दिन फक्त एक उपचार झाला आहे, असे विवेक वेलणकर यांनी सांगितले.

लोकशाही दिनाच्या द्विस्तरीय प्रक्रियेची परिपूर्ण माहिती देणारे फलक महापालिकेच्या मुख्य इमारतीत , परिमंडळ कार्यालयात तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयात ठळकपणे दिसतील अशा प्रकारे लावावेत. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही ही माहिती सहज सापडेल, अशा पद्धतीने प्रसिद्ध करावी; तसेच यासाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.