पुणे : शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा कहर कमी झाला आहे. शहरात जुलैपासून वाढत गेलेली या आजारांची रुग्णसंख्या नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. या महिन्यात डेंग्यूचे ५८ संशयित रुग्ण आढळले असून, चिकुनगुन्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात डेंग्यूचे या वर्षभरात ४ हजार ४२२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३५७ रुग्ण निदान झालेले आहेत. यंदा जुलैपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली. जुलैमध्ये डेंग्यूचे संशयित रुग्ण ६३६, ऑगस्ट १ हजार १५०, सप्टेंबर १ हजार २९१, ऑक्टोबर ८०० आणि आता नोव्हेंबरमध्ये ही रुग्णसंख्या ५८ वर आली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली होती. त्यात नंतर वाढ होत गेली होती. पावसाळा संपल्यानंतर ही रुग्णसंख्या कमी झाली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता; सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

शहरात चिकुनगुन्याचे रुग्ण जुलैपासून वाढले. शहरात यंदा चिकुनगुन्याचे एकूण ४४८ रुग्ण आढळले आहेत. त्यात जुलै २४, ऑगस्ट ५२, सप्टेंबर २२५, ऑक्टोबर १३७ अशी रुग्णसंख्या आहे. या महिन्यात चिकुनगुन्याचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या काळात डासांमुळे पसरणारे आजार वाढतात. या काळात डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत असल्याने या आजारांचा प्रादुर्भाव अधिक असतो. पावसाळा संपल्याने डासांची उत्पत्ती कमी होऊन आजारांचे प्रमाणही कमी होते, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी

डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यावर भर

शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला होता. यात औषध फवारणी करण्यात येत होती. याचबरोबर डासोत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट करण्यात आली. डासोत्पत्ती स्थाने आढळल्या प्रकरणी महापालिकेने २ हजार ४१६ घरमालकांना नोटीस बजावून ७ लाख ८४ हजार २५० रुपयांचा दंड वसूल केला.

Story img Loader