पुणे : विमानतळावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना कानपिचक्या दिल्या. आमदार दिलीप मोहिते पाटलांनी आपल्या भाषणात चाकण, खेड परिसरात विमानतळ झालं असत तर चाकण एमआयडीसी मध्ये आलिशान हॉटल्स असते, पण, ते विमानतळ आता बारामतीला गेलं, किमान आम्हाला डोमॅस्टिक विमानतळ द्यावं अशी विनंती त्यांनी अजित पवार यांना केली. हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ हे काय खेळण्यातील नाही की अजून एक द्या अस म्हणायला, त्याचा सर्व्हे करायला लागतो, उगाच बारामती, बारामती करू नका. विमानतळ बारामतीला नेहलं जाणार नाही. अस अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते चाकण येथे खासगी हॉटेल्स च्या उदघाटना प्रसंगी आले होते 

राष्ट्रवादी पक्षाचे खेड चे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात खेड तालुक्यात न झालेल्या विमानतळाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आपल्याकडील काही नेत्यांनी विरोध करायला नको होता. विमानतळ झालं असत तर चेहरा मोहरा बदलला असता. आता ते विमानतळ बारामती ला करायचं ठरवलं आहे. विमानतळ झालं असत तर आणखी विकास झाला असता, अनेकांनी हॉटेल्ससाठी जागा घेतल्या होत्या. हॉटेल चे नामांकित ग्रुप या परिसरात आले असते. अजित पवार यांना विनंती आहे की, आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बारामतीला गेलं त्याचा आनंद आहे. निदान डोमॅस्टिक विमानतळ व्हावं. लोहगाव च विमानतळ हे लष्कराच आहे. त्यामुळं खेड, चाकण परिसरात विमानतळ व्हावं ही मागणी आहे. याबाबत अजित पवार यांनी मला शब्द दिलाय आणि ते पाळतात हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अस मोहिते पाटल म्हणाले. 

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की

तोच धागा पकडून अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, एअरपोर्ट बारामतीला नेहलं जाणार नाही. कारण नसताना उगाच बारामती, बारामती करू नका. एअरपोर्ट च्या बाबतीत हवाई उड्डाण सर्व्हे करत, संरक्षण विभाग मान्यता देत. कारण इथं लष्कराच्या विमानांना सराव करायचा असतो. दोन- दोन विमानतळ देता येत नाही, एक विमानतळ होता- होता नाकी नऊ आलेत, किती वर्षे झालं हा विषय सुरू आहे. हे काय खेळण्यातील विमानतळ आहे का? की अजून एक विमानतळ द्या. अस होत नाही, कृपया गैरसमज घेऊन करू नका. 

पुढे ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड, पुणे हे दोन्ही शहर जगाच्या नकाशा एकच आहेत म्हणून ओळखले जातात. उद्योपतींना स्वतः च प्लेन घेऊन उतरता आलं पाहिजे, दिवसभर काम करून त्याला जाता आलं पाहिजे. अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी करायचं ठरवलं आहे. त्याकडे माझं बारकाईने लक्ष आहे. मुंबई च्या विमानतळावरील लोड कमी करायचं चाललं आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची नितांत गरज आहे. ते कुठं व्हावं, हवाई उड्डाण मंत्रालय पाहणी करतय. अस अजित पवार म्हणाले, 

मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन चा सर्व्हे

अजित पवार म्हणाले की, मुंबई ते हैद्राबाद चा सर्व्हे सुरू आहे. ती मुंबई, नवी मुंबई, मावळ, बारामती, पुरंदर, हवेली, खेड, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, इथून जाणार आहे. त्यात फार कमी स्थानक असलेली बुलेट ट्रेन ची आखणी सेंट्रल गव्हरमेंट करत आहे. अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.