महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (महाराष्ट्र वॉटर रिर्सोसेस रेग्युलेटरी ॲथॉरिटी – एमडब्ल्यूआरआरए) आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंडळ (सेंट्रल पब्लिक हेल्थ बोर्ड) यांनी दिलेल्या मापदंडापेक्षा पुणेकर जास्तीचे पाणी वापरतात, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली.

हेही वाचा >>>पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे पावणे दोन कोटींची खंडणी

gadchiroli marathi news, gadchiroli upsc marathi news
गडचिरोलीत स्वत:हून ‘पोस्टिंग’ घेणाऱ्या बीडीओची ‘युपीएससीत’ही भरारी…..
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक

महापालिका खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून वर्षाला तब्बल २० अब्ज घनफूटांपेक्षा (टीएमसी) जास्त पाणी वापरते. तरीदेखील महापालिकेत ३४ गावे समाविष्ट झाल्याने खडकवासला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील निवासी करण्यात आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी महापालिकेला उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ, संजय जगताप आणि इतर लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा >>>पुणे: सीरम कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची ४१ लाखांची फसवणूक

ते म्हणाले, ‘जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंडळ यांनी दिलेल्या मापदंडापेक्षा पुणे महानगरपालिका जास्तीचे पाणी वापर करीत आहे. त्या अनुषंगाने जलसंपत्ती प्राधिकरणातर्फे ठोक जलदराप्रमाणे महापालिकेला दंडनीय आकारणी करण्यात येते.’
दरम्यान, महापालिकेकडून १० डिसेंबर २०२१ च्या पत्रान्वये महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ११ गावे आणि नव्याने समाविष्ट २३ गावांसाठी वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने घरगुती व औद्योगिक वापरासाठी मुळशी धरणातून पाच अब्ज घनफूट (टीएमसी) वाढीव पाण्याची मागणी केली आहे. महापालिकेला सन २०३१ साली होणाऱ्या ७६ लाख १६ हजार एवढ्या लोकसंख्येसाठी राज्य शासनाने प्रतिवर्षी १४.६१ टीएमसी पाणी देण्यास यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

हेही वाचा >>>पुणे: पौष्टिक तृणधान्यांच्या विकासासाठी सप्तसूत्री; आगामी वर्षांत कृषी विभाग राबविणार नियोजबद्ध कार्यक्रम

कालवा दुरुस्ती लवकरच
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांतर्गत येणारे कालवे, बंधाऱ्यांची दुरवस्था झालेली नाही. या कालव्यांचे नियमित परीक्षण व दुरुस्ती करण्यात येते आणि त्याआधारे कालव्यातून सिंचनासाठी पाणी देण्यात येते. जुना मुठा उजवा कालवा १६० वर्ष जुना आहे, तर नवीन मुठा उजवा कालवा ६० वर्ष जुना आहे. या कालव्यांचे नूतनीकरण आणि अस्तरीकरण करणे गरजेचे असून त्या कामांची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यानुसार जुना मुठा उजवा कालवा आणि नवीन मुठा उजवा कालवा आणि त्यावरील वितरण प्रणाली आणि बंधाऱ्यांची दुरुस्ती कामांपैकी एका कामाचे अंदाजपत्रक प्रदेश कार्यालयाला सादर करण्यात आले आहे. उर्वरित कामांची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. या कामांना मान्यता घेऊन निधी उपलब्धतेनुसार कामे प्रस्तावित आहेत, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.