पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोडवरील पुलाचे उदघाटन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी,स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेवरुन अनेकांनी टीका केली. पण योजनेला राज्यातील महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सध्याच्या घडीला १ कोटी ५६ लाख महिलांचे अर्ज दाखल झाले आहे. त्यापैकी काल ३५ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर आज आणि उद्या या दोन दिवसात किमान ५० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे नियोजन आहे. हेही वाचा.पिंपरी : एकाच जागी अनेक वर्षे नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची लवकरच उचलबांगडी १७ तारखेपर्यंत सव्वा कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होतील, ही योजना पुढील काळात देखील चालू राहण्यासाठी नियोजन केल आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या बाबतीत बोलायच झाल्यास,बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असं आमचं सरकार असल्याच सांगत विरोधकांना अजित पवार यांनी सुनावले.