deputy engineer of rural water supply sub division caught while taking bribe pune print news rbk 25 zws 70 | Loksatta

पुणे :ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागातील उपअभियंत्याला लाच घेताना पकडले

बील मंजुरीसाठी ताकवले यांनी तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.

पुणे :ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागातील उपअभियंत्याला लाच घेताना पकडले
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

ग्रामीण पाणी पुरवाठा योजनेतील पाइप खरेदीचे बील मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून ७० हजारांची लाच घेणाऱ्या उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. भोरमधील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

जयंत सोपानराव ताकवले असे लाचखोर उपअभियंत्याचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. ताकवले भोर-वेल्हा तालुक्यातील पाणी पुरवठा उपविभागात उपअभियंता आहेत. तक्रारादाराकडून पाणी पुरवठा योजनेसाठी पाइप खरेदी करण्यात आले होते. पाइप खरेदीचे बील मंजुरीसाठी उपअभियंता ताकवले यांच्याकडे पाठविण्यात आले होते. बील मंजुरीसाठी ताकवले यांनी तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा >>> पुणे : हडपसर भागात भरधाव ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू, अपघातानंतर ट्रक चालक पसार

तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन भोर पंचायत समितीच्या आवारात ताकवले यांनी मंगळवारी दुपारी बोलावले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या ताकवले यांना ताब्यात घेतले. ताकवले यांच्या विरुद्ध भोर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक भारत साळुंके तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 23:13 IST
Next Story
राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सुटीच्या दिवशीही जादा तासिका; – राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध