पिंपरीः एसकेएफ कंपनीच्या उपव्यवस्थापकाला ४८ लाखांच्या अपहार प्रकरणी अटक | Deputy manager of SKF company arrested in case of embezzlement of 48 lakhs pune print news amy 95 | Loksatta

पिंपरीः एसकेएफ कंपनीच्या उपव्यवस्थापकाला ४८ लाखांच्या अपहार प्रकरणी अटक

पदाचा गैरवापर करून ४८ लाख रूपयांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एसकेएफ कंपनीतील उपव्यवस्थापकाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरीः एसकेएफ कंपनीच्या उपव्यवस्थापकाला ४८ लाखांच्या अपहार प्रकरणी अटक
( फोटो सौजन्य : फेसबुक )

पदाचा गैरवापर करून ४८ लाख रूपयांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एसकेएफ कंपनीतील उपव्यवस्थापकाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.योगेश मोहनराव भोसले (वय-३७, रा. डांगे चौक, थेरगाव) असे या उपव्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले हे चिंचवडच्या एसकेएफ कंपनीचे प्रशासन व सुविधा या विभागाचे उपव्यवस्थापक होते.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या प्रकल्पांना ‘राष्ट्रवादी’कडून खोडा; भाजपाचा आरोप

कंपनीने दिलेल्या पदाचा गैरवापर करून ६ एप्रिल ते ६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत त्यांनी ४८ लाख ५७ हजार रूपयांचा अपहार केला. याबाबतची तक्रार कंपनीने केल्यानंतर भोसलेला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 17:27 IST
Next Story
पुणे :डाॅ. मोहन आगाशे यांना ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर; साधना बहुळकर यांना ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’