scorecardresearch

बागेश्वर महाराजांनी माफी न मागितल्यास वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ;  तुकाराम महाराजांच्या वंशजांचा इशारा

श्री संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर महाराज यांनी समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागून यापुढे असली बेजबाबदार वक्तव्ये बंद करावीत.

बागेश्वर महाराजांनी माफी न मागितल्यास वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ;  तुकाराम महाराजांच्या वंशजांचा इशारा
बागेश्वर महाराजांनी माफी न मागितल्यास वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ;  तुकाराम महाराजांच्या वंशजांचा इशारा( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पिंपरी: श्री संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर महाराज यांनी समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागून यापुढे असली बेजबाबदार वक्तव्ये बंद करावीत. नाहीतर नाठाळाला वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा इशारा तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हभप संभाजी महाराज देहूकर यांनी दिला आहे.मती भ्रष्ट झालेल्या बागेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक उचापती सुरू आहेत. शुद्ध, सात्त्विक वारकरी-भागवत संप्रदाय विटाळण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या तथाकथित पाठीराख्यांची उठाठेव पुण्यनगरीत चालू असल्याची टीकाही त्यांनी केली.

बागेश्वरमहाराज यांनी काही महिन्यांपूर्वी संत तुकाराममहाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. बागेश्वरमहाराज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. संत तुकाराममहाराजांवर केलेल्या टीकेचा समाचार संभाजीमहाराज देहूकर यांनी घेतला आहे. ते म्हणाले, की आध्यात्मिक किंवा संप्रदायात मोठे असल्याचे मिरवण्यासाठी संत आणि संतचरित्राची निंदा करणारे बागेश्वर महाराजांसारखे रागेश्वरी, भ्रमिष्ट, निंदक हे तुकोबारायांच्या काळातही होते. आजसुद्धा आहेत, हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे दुर्दैव म्हणावे लागेल. ‘तुकोबारायांबाबत बागेश्वरमहाराज यांनी खोडसाळपणे वक्तव्य केले आहे. त्यांचा हा मूर्खपणा कोणालाच मान्य नाही. आध्यात्मिक सत्याचा खून करून असत्याचा डांगोरा पिटणाऱ्या भोंदूबाबाचा आम्ही निषेध करत आहेत,’ असेही ते म्हणाले.

sanjay-raut-on-devendra-fadnavis-and-eknath-shinde
“वाघनखांनी जसा अफजल खानावर हल्ला झाला तसाच शिंदे-फडणवीस सरकारवरही…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
Shivaji Maharaj
लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा – मुनगंटीवार
Ichalkaranji
कोल्हापूर : संभाजी महाराज पुतळा उभारणीवरून इचलकरंजीत आमदार – माजी नगरसेवकात शाब्दिक चकमक
Aditya Thackeray Hasan Mushriff
ती वाघनखं शिवाजी महाराजांची की शिवकालीन? आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर हसन मुश्रीफ म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Descendants of tukaram maharaj warn that we are capable of punishing bageshwar maharaj if he does not apologize pune print news ggy 03 amy

First published on: 20-11-2023 at 22:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×