सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. पूजा दोशी यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संशोधन करून हिमआधार या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली. या औषधाचे एकस्व अधिकार (पेटंट) मिळवण्यात आले असून, हे औषध सिकलसेल ॲनिमिया आजारावर आणि रक्तवर्धक,रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, रक्तशुद्धी करण्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला. 

हेही वाचा >>>पुणे : ‘एएफएमसी’च्या संचालकपदी आरती सरीन

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती आणि व्यावसायीकरण करण्यात आले. इनोवेशन इन मेडिकल, फार्मास्युटिकल अँड अलाईड सायन्सेस फॉर कमर्शिअलायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी (इम्पॅक्ट २.०) या कार्यक्रमात औषधाबाबतची घोषणा करण्यात आली. डॉ. दोशी यांच्यासह त्यांचे विद्यार्थी नितीन कदम, युवराज काळे यांचा या संशोधनात सहभाग होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील मुख्य नवोपक्रम अधिकारी डॉ. अभय जेरे, विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळिग्राम, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संशोधन संचालक (अतिरिक्त) डॉ. डी. के. अगरवाल, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा >>>‘विघ्नहर’कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड ; दिवाळीपूर्वी उसाची रक्कम, कामगारांना १२ टक्के बोनस

जगात सिकलसेल ॲनिमिया या आजाराचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के आहे. भारत आणि नायजेरियात हे प्रमाण सर्वाधिक आहे. या आजारात माणसाच्या शरीरात रक्त फार कमी प्रमाणात तयार होते. तसेच सामान्य माणसाच्या तुलनेत लाल पेशीही कमी असतात. यामुळे व्यक्तीला थकवा येण्याची लक्षणे आढळतात. औषधाच्या निर्मितीबाबत डॉ. दोशी म्हणाल्या, मी स्वतः सिकलसेल ॲनिमिया या आजाराची रुग्ण असल्याने औषधाची कल्पना पुढे आली. अभ्यासादरम्यान आम्ही ५० ते ६०पेक्षा जास्त औषधी वनस्पतींवर प्रयोग करून, आदिवासी भागातील रुग्णांचे नमुने घेऊन, अनेक दिवस प्रयोग करून हिमआधार या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली. या औषधाचे एकस्व अधिकारही मिळवले. हे आयुर्वेदिक औषध असल्याने त्याचे दुष्परिणाम होणार नाही.