भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांची भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले वस्तु संग्रालय येथे येऊन भेट घेतली आणि तब्येती बाबत विचारपूस देखील केली.तर मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गिरीश बापट यांची भेट घेतली होती.
त्या भेटीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी अडीच वर्षांपूर्वी तुम्हाला मुख्यमंत्री होऊ द्यायच नव्हता आणि त्यावेळी तुमचा अभिमन्यू केला अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल आहे.त्यावर ते म्हणाले की,मी मुख्यमंत्री होऊ नये.त्यासाठी अनेक प्रयत्न देखील झाले.ते काही काळ यशस्वी देखील झाले असतील.पण माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आज आधुनिक युग आहे.

आज आपण अभिमन्यूकडून खूप काही गोष्टी शिकलो आहोत. जे काही आपले पौराणिक आणि थोर लोक असतात.त्याच्याकडून काही शिकता येत.तो चक्रव्यूह कसा तोडयाचा आणि तो भेदून कस बाहेर यायच.ते माहिती असल्यामुळे तो चक्रव्यूह आम्ही तोडला आहे. त्यानंतर शिंदे आणि आम्ही सरकार स्थापन केल आहे.अशी भूमिका मांडत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे त्यांनी टीका केली.

lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप