पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची आठवण सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोळे पाणावले. ३ जानेवारी रोजी लक्ष्मण जगताप यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. आज पिंपरी – चिंचवडमध्ये आदरांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की. लक्ष्मण भाऊंच्या आजारपणात राज्यसभेची निवडणूक होती. निवडून येण्याचे गणित आम्ही मांडत होतो, मते कमी होती. अशा परिस्थितीत भाऊंची तब्बेत खालावलेली असल्याने त्यांना आणायच की नाही, असा प्रश्न आमच्यासमोर होता. गिरीश महाजन हे त्यांच्या संपर्कात होते. लक्ष्मण भाऊंनी शंकर जगताप यांच्याकडे निरोप दिला. शंकर जगताप यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आले की भाऊ येणार आहेत. इतकी तब्बेत खालावलेली असताना पीपीईकिट घालून लाईफ सेव्हिंग रुग्णवाहिकेतून पूर्णपणे झोपून ते मुंबईत आले. आम्ही सर्व जण खाली त्यांना घ्यायला उभे होतो. पीपीई किट, मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरले. विरोधी पक्षनेते असताना ते सॅल्युट करून म्हणाले, मुख्यमंत्री साहेब तुमच्यासाठी आलो. आजही ती आठवण आली की डोळे भरून येतात. अशी आठवण सांगत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांचे डोळे भरून आले होते. 

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

हेही वाचा – पुण्यातून हुबळीसाठी थेट विमान, इंडिगो कंपनीची ५ फेब्रुवारीपासून सुविधा

हेही वाचा – जी-२० परिषदेसाठी पुण्यात परदेशी पाहुणे येण्यास सुरूवात, जिल्हाधिकाऱ्यांनी ओमानच्या प्रतिनिधींना पुणेरी पगडी घालून केले स्वागत

फडणवीस पुढे म्हणाले की, विधानपरिषदेच्या वेळी निरोप दिला होता गरज नाही येऊ नका. विधानपरिषद महत्वाची नाही, जिंकलो, हरलो महत्वाचे नाही शंकर जगताप यांना आम्ही पटवून सांगितले. पण नंतर फोन आला की भाऊ ऐकायला तयार नाहीत. भाऊ म्हणतात काही झाले तरी मी येणार. पुढे ते म्हणाले की, लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयात भेटण्यासाठी गेलो. त्यांना अनेक प्रकारची उपकरणे लावलेली होती. त्यांनी आम्हाला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. अशा परिस्थितीत त्यांनी शंकर जगताप यांना सांगितले की यांना चहा घेतल्याशिवाय जाऊ देऊ नका. लक्ष्मण जगताप हे अजब रसायन होते, असे म्हणत त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगितल्या.