scorecardresearch

पुणे: जयकुमार गोरे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस रुग्णालयात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.

पुणे: जयकुमार गोरे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस रुग्णालयात
जयकुमार गोरे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस रुग्णालयात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. तसेच पूर्वीसारखे लवकर ठणठणीत बरे व्हा आणि कामाला लागा अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी गोरे यांना दिल्या.

हेही वाचा >>>पुणे : नाना पेठेत कोयते उगारून टोळक्याची दहशत; पाच जण अटकेत

भाजपचे आमदार गोरे यांच्या गाडीला सातारा येथे काही दिवसांपूर्वी पहाटे सव्वातीन वाजता अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रुग्णालयात जाऊन गोरे यांच्या तब्येतीची विचापूस केली. लवकर बरे होऊन कामाला लागण्याच्या शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या. गोरे यांची तब्येत आता सुधारत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या वेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 23:19 IST

संबंधित बातम्या