scorecardresearch

“महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार”, फडणवीसांची प्रतिक्रिया; पोटनिवडणुकीवर म्हणाले, “बिनविरोध होण्यासाठी महाविकास..”

कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बिनविरोध निवडणुकीऐवजी या मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याची चर्चा आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार”, फडणवीसांची प्रतिक्रिया; पोटनिवडणुकीवर म्हणाले, “बिनविरोध होण्यासाठी महाविकास..”
फडणवीसांची प्रतिक्रिया (लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे – कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बिनविरोध निवडणुकीऐवजी या मतदारसंघामध्ये उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार, मात्र विनंती मान्य करायची की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीने अनेकवेळा विनंती केली, आम्ही मान्य केली. आता त्यांनी काय करायचे हे त्यांनी ठरवायचे. पण, मला वाटते निवडणुका न होता बिनविरोध उमेदवारांना निवडून देणे हे सर्वांसाठी उचित राहील, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – ठाणे : अंबरनाथमध्ये रेल्वे अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू, १४ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली

सत्यजीत तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उभे आहेत. सत्यजीत यांच्यावर काँग्रेस नाराज असून त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना विचारले असता, सत्यजीत हे अपक्ष उभे आहेत, त्यांना काँग्रेसने निलंबित केले आहे. तिथली नेमकी परिस्थिती काय? हे माझ्या ऐवजी त्यांना विचारायला हवे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – पुणे : कसब्यात राष्ट्रवादीचा सावध पवित्रा, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचे निश्चित

राज्य सरकारचे विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी होकारार्थी उत्तर देत शंभर टक्के मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 21:23 IST

संबंधित बातम्या