scorecardresearch

कसबा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच पुण्यात; प्रतिक्रिया देताना म्हणाले “आता आम्ही पोस्टमार्टम..”

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवावर पक्षांतर्गत काही चर्चा झाली का किंवा शहर पातळीवर बदल होणार आहेत का? यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on Kasba election
कसबा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच पुण्यात (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केल्यानंतर भाजपाचे नेते, तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच पुणे दौऱ्यावर आले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवावर पक्षांतर्गत काही चर्चा झाली का किंवा शहर पातळीवर बदल होणार आहेत का? यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“एखादी निवडणूक जिंकलो किंवा हरलो तर त्याने काही फार फरक पडत नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मुल्यमापन किंवा दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास त्याचा पोस्टमार्टम करीत असतो. ते आम्ही केल असून, आम्ही काळजी घेऊ”, असे फडणवीस म्हणाले.

मला त्याबाबत माहिती नाहीफडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला त्याबाबत काही माहिती नाही. माध्यमातूनच ही माहिती पाहायला मिळत आहे. असे सांगत त्यावर त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा – पुणे : कौटुंबिक न्यायालय नूतन वास्तुच्या उद्घाटनानंतर साडेपाच वर्षे वाहनतळ बंद

आम्ही त्यांच्या काळातील पैसे देत आहोत

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ‘त्या’ चार अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार?

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामे झाले नाही. त्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याची सुरवातदेखील झाली आहे. तसेच सर्वांचे पंचनामे होण्यास थोडा वेळ लागणारच आहे. तसेच मला विरोधी पक्षाचे आश्चर्य वाटते. आम्ही त्यांच्या काळातील पैसे देत आहोत. आता रात्री पाऊस पडला तर ते सकाळी गोंधळ घालण्यास सुरुवात करतात. हे योग्य नाही, असे सांगत महाविकास आघाडीतील नेत्यांना त्यानी सुनावले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 18:15 IST