पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भाविकाने मोतीचूर बुंदीचा तब्बल १७५ किलोचा लाडूचा प्रसाद आज अर्पण केला. ६ व्यक्तींच्या मदतीने ४८ तासांत हा लाडू बनवण्यात आला आहे.
पुण्यातील निखिल मालानी यांच्या दीपक केटरर्स मार्फत हा मोतीचूर बुंदीचा १७५ किलोचा लाडूचा प्रसाद श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण करण्यात आला आहे. ४८ तासांत ६ कारागिरांच्या मदतीने हा लाडू बनविण्यात आला आहे. हा १७५ किलोचा लाडू भाविकांचे आकर्षण बनला असून हा प्रसाद पाहण्यासाठी आणि त्याचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे.
दरम्यान, याच उत्सव काळात बापाच्या चरणी वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी दोनच दिवसांपूर्वी काका हलवाईचे महेंद्र गाडवे आणि युवराज गाडवे यांच्याकडून १५१ किलोचा मोदक बनवून तो दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केला होता. हा काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यांसह चांदीचे वर्क केलेला मोदक सलग आठ तासांच्या मेहनतीनंतर १५ कारागिरांच्या मदतीने तयार करण्यात आला होता.