निलेश लंके, सुनील शेळके आणि मला (धंनजय मुंडे) तिघांना ग्रहण लागले होते. अजित पवार यांनी उमेदवारी देऊन ते काढण्याच काम केले अन्यथा आयुष्यभर ग्रहण होत जे कधीच निघाले नसते असे सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांनी म्हटले आहे. वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. 

“व्यासपीठावर तीन असे सूर्य आहेत ज्यांना ग्रहण लागलं होतं. पहिला मी, दुसरे निलेश लंके आणि तिसरे सुनील शेळके. आम्ही तिघे आज जे आहोत, ते दादांनी आमच्यासारख्या तरुणांवर विश्वास टाकला म्हणून आहोत. अन्यथा हे आयुष्यभराच ग्रहण होत जे कधी निघलं नसत. ते दादांनी काढलं,” असे धंनजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अजित दादा असतील तरच पक्ष प्रवेश

यावेळी धनंजय मुंडे यांनी आमदार निलेश लंके यांचा पक्ष प्रवेशाचा किस्सा सांगितला आहे. “पक्ष प्रवेशावेळी निलेश लंके यांना कळालं की दादा येणार नाहीत. पुणे-नगर रोड च्या फाट्यापासूनच पारनेरला यायलाच तयार नव्हते. मी म्हटलं आम्ही सर्व जण आहोत. लंके म्हणाले, तुमचा उपयोग नाही. अजित दादा असतील तर माझा प्रवेश आहे. नाहीतर काही खरे नाही. मग, दादांचे फोनवर बोलणं करून दिली आणि लंके यांचे समाधान झालं. आज ते आमदार आहेत,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

मी निवडून येणार की नाही हे माहीत नव्हतं पण…

“मी तर २०१४ला पराभूत झालो होतो. पराभूत झालेल्या उमेदवाराला अजित पवार आणि शरद पवार यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी बसवले. निलेश लंके हे ६४ हजार, सुनील शेळके ९४ हजार मतांनी आणि मी निवडून येणार का नाही हे कोणालाच माहीत नव्हतं. पण ३२ हजार मतांनी निवडून आलो. माझी लढाई वेगळीच होती. शरद पवार यांनी आमच्यात काय पाहिलं हे माहीत नाही,” असेही मुंडे म्हणाले.

ईडी ची चव घालवू नका…..

“भाजपाने दादांच्या पाठीमागे, ईडी, सीबीआय लावली सर्व यंत्रना लावल्या पण त्यांना काही मिळालं नाही. ईडीची चव घालवू नका! मराठवाड्यात शेतमजूर सुद्धा मजूर विडी खिशात ठेवतो. त्याची सुद्धा ऐपत असते,” असा टोला धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकार ला लगावला आहे.