पुणे : पाकिस्तानमधील लयारी, तेथील कुख्यात गुंड टोळ्या, त्यांची असणारी दहशत आणि राजकीय कनेक्शन याचा थरार मांडणारा धुरंधर-२ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट उत्पन्नाचे विक्रम मोडीत काढत आहे. हमजा आणि बडे साहेब यांच्यात नेमकं काय होतं, यासह इतर अनेक कोडी उलगडणारा धुरंदरमधील हा थरार आणखी चांगल्या पद्धतीने आणि सर्वांत मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘एपिक’ अनुभव दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतात प्रथमच हिंजवडी आयटी पार्कमध्ये मिळत आहे.
दक्षिण भारतात आधीच लोकप्रिय ठरलेल्या ‘एपिक’ या अत्याधुनिक सिनेमा अनुभवाने आता पुण्यात प्रवेश केला असून, उद्घाटनावेळी आयोजित केलेल्या ‘धुरंधर-२’च्या स्पेशल स्क्रीनिंगने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. क्यूब सिनेमाने आपल्या प्रीमियम लार्ज-फॉरमॅट ‘एपिक’ सिनेमा महाराष्ट्रात पहिल्यांदा पुण्यातील हिंजवडी येथील ई-स्क्वेअर सिनेमाजमध्ये केला.
दक्षिण भारतात २०१९ पासून सुल्लूरपेट, कोईमतूर, कोझिकोड, मदुराई, तंजावूर, हैदराबाद, त्रिचूर, राजापालयम आणि चेन्नई या शहरांमध्ये ‘एपिक’ला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाही हा भव्य, इमर्सिव्ह अनुभव मिळणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.ई-स्क्वेअर सिनेमाजमधील एपिक ऑडिटोरियममध्ये सिनेमा पाहण्याचा वेगळाच थरार प्रेक्षकांना अनुभवता येत आहे.
संपूर्ण भिंतभर पसरलेली मोठी स्क्रीन, स्टेडियम-शैलीतील आरामदायी आसनव्यवस्था आणि प्रत्येक सीटवरून मिळणारा परफेक्ट व्ह्यू—हे सगळे मिळून प्रेक्षकांना चित्रपटाच्या जगात पूर्णपणे बुडवून टाकते. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही एपिकने एक पाऊल पुढे आहे. बार्को फोर-के आरजीबी लेझर प्रोजेक्शन, डॉल्बी ॲटमॉस इमर्सिव साउंड आणि १.८९:१ स्क्रीन रेशोमुळे प्रत्येक फ्रेम अधिक जिवंत वाटते.
उच्च ब्राइटनेस, अचूक रंगसंगती आणि जबरदस्त साऊंड इफेक्टमुळे अॅक्शन, ड्रामा किंवा रोमांसच्या प्रत्येक सीनचा प्रभाव दुपटीने वाढतो.क्यूब सिनेमा चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष रोहतगी म्हणाले, “दक्षिण भारतात एपिकने प्रीमियम सिनेमाचा नवा मापदंड तयार केला आहे. आता पुण्यातून पश्चिम भारतात विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे. ई-स्क्वेअरसोबतची भागीदारी हा आमच्यासाठी योग्य निर्णय ठरला.”
ई-स्क्वेअर लीजर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत पंचामिया यांनी सांगितले, “आमचा नेहमीच उद्देश प्रेक्षकांना सर्वोत्तम आणि वेगळा अनुभव देण्याचा आहे. एपिक हा केवळ सिनेमा नाही, तर एक भव्य अनुभव आहे. ‘धुरंधर’च्या स्पेशल स्क्रीनिंगमुळे या लॉन्चला आणखी ग्लॅमर मिळाले.”
‘एपिक’ म्हणजे काय?
‘एपिक’ हा क्यूब सिनेमा द्वारा विकसित प्रीमियम लार्ज-फॉरमॅट सिनेमा अनुभव आहे. फोर-के रिझोल्यूशन, उच्च-कॉन्ट्रास्ट आरजीबी लेझर प्रोजेक्शन आणि इमर्सिव साउंडसह तयार केलेले विशेष डीसीपी कंटेंट प्रेक्षकांना वेगळ्याच स्तरावर नेते. स्क्रीन, साऊंड, सीटिंग आणि लाइटिंग हे सर्व घरच प्रेक्षकांना ‘परफेक्ट सिनेमा मोमेंट’ देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. आता महाराष्ट्रातही ‘एपिक’चे पाऊल पडले आहे.
