पुणे : आठवडय़ापासून सुरू झालेल्या इंधनाच्या दरवाढीत डिझेलचे दर लिटरमागे सुमारे चार रुपयांनी वाढले असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. डिझेलचे वाढते दर लक्षात घेता येत्या काही दिवसांत माल आणि प्रवासी वाहतूक महागणार असल्याचे संकेत वाहतूकदारांकडून देण्यात आले आहेत. इंधनाची शेवटची दरवाढ नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती. केंद्र शासनाकडून करण्यात आलेल्या कर कपातीनंतर ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. सुमारे पाच महिने इंधनाचे दर स्थिर होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही इंधनाचे दर कायम होते. मात्र, २२ मार्चला इंधनाच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली. त्यानंतर दररोजच काही पैशांनी डिझेलसह पेट्रोलच्या दरातही वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये सहा वेळा डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ झाली. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास सध्याच्या भाडेदरात वाहतूकदारांना व्यवसाय करणे परवडणार नसल्याचे स्पष्ट करीत वाहतुकीच्या दरवाढीबाबत सूतोवाच करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी याबाबत सांगितले,की गेल्या आठवडय़ाभरात दररोजच डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सुमारे चार रुपयांनी डिझेल महागले आहे. डिझेलच्या दरवाढीच्या प्रमाणात वाहतूकदारांना प्रवासी आणि माल वाहतुकीचे दर मिळत नाहीत. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यातून महागाई वाढणार असून, त्याचा फटका सर्वसामान्यांनाच बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील ऑइल कंपन्यांशी चर्चा करून डिझेलचे दर स्थिर ठेवण्याबाबत काही पर्याय शोधावेत, अन्यथा वाहतूकदारांना व्यवसाय करणे कठीण होईल.

Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक