महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत २ ऑक्टोबरपासून राज्याच्या महसूल विभागाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी संके तस्थळावर मोबाइल क्रमांक व ओटीपीद्वारे डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खाते उतारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

राज्यातील ९९ टक्के  सातबारा व खाते उतारा डिजिटल स्वाक्षरीयुक्त करण्यात आले आहे असून ते नागरिकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाला महाभूमी संके तस्थळावर नोंदणी करावी लागते. त्यासाठी आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादी माहिती नमूद करुन नोंदणी करावी लागते. अशा नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा लॉगइन आयडी व पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो. तो विसरल्यास परत मिळवण्यासाठी वेळ जात होता. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी ई-फे रफार प्रणालीच्या महाभूमी संके तस्थळावर मोबाइल क्रमांक आणि ओटीपीच्या मदतीने लॉगइन सुविधा राष्ट्रीय सूचना विज्ञान के ंद्र, पुणे (एनआयसी) यांनी विकसित केले आहे. त्यानुसार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खातेउतारा प्रत्येकी १५ रुपये शुल्क एटीएमकार्ड, क्रे डिट कार्ड, नेट बँकिं ग, आयएमपीएस किंवा भीम अ‍ॅपद्वारे ऑनलाइन भरुन तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आला आहे, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

आतापर्यंत महाभूमी संके तस्थळावर दोन लाख ५६ हजार नोंदणीकृत वापरकर्ते असून त्यांना त्यांचे जुने खाते वापरुनही ही सेवा वापरता येणार आहे. आणि डिजिटल सातबारा, आठ-अ हवा असल्यास नोंदणी न करता देखील महाभूमी संके तस्थळावर मोबाइल क्रमांक नमूद करुन लॉगइन करता येईल. या पडताळणीसाठी मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी वापरुन तातडीने सातबारा, आठ-अ उपलब्ध करून देण्यात आला आहे. वापरकर्त्यांच्या मोबाइल क्रमांकावरुन तयार होणाऱ्या खात्यात भरलेली मात्र, न वापरलेली शिल्लक रक्कम त्याच खात्यावर पूर्वीप्रमाणेच शिल्लक राहणार आहे. त्यामुळे यापुढे मोबाइल क्रमांकावर आपले खाते तयार होईल, त्याद्वारे वापरकर्त्यांला महाभूमी संके तस्थळाच्या सर्व सुविधा वापरता येणार आहेत. या नव्या सुविधेमुळे डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खाते उतारे मिळवणे सोपे आणि जलद झाले आहे, असेही जगताप यांनी सांगितले.

शासनाला तीन कोटी ६५ लाखांचा महसूल

आतापर्यंत महाभूमी संके तस्थळावरून २३ लाख डिजिटल स्वाक्षरीयुक्त आणि एक लाख ४० हजार डिजिटल स्वाक्षरीयुक्त खाते उतारे नागरिकांनी डाउनलोड केले आहेत. त्यातून शासनाला तीन कोटी ६५ लाख रुपये महसूल प्राप्त झाला आहे. डिजिटल सातबारा आणि खाते उतारा मिळवण्यासाठी लॉग इन करण्यासाठी   digitalsatbara. mahabhumi. gov.in/DSLR हा दुवा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खातेउतारा प्रत्येकी १५ रुपये शुल्क एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, आयएमपीएस किंवा भीम अ‍ॅपद्वारे ऑनलाइन भरुन तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आला आहे, अशी माहिती  प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.