पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात पार्क केलेल्या चिंचवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची चारचाकी गाडी दिव्यांग व्यक्तीने पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अपक्ष अंध उमेदवार विनायक सोपान ओव्हाळ आणि त्यांचा साथीदार नागेश गुलाबराव काळे यांनी गाडी पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेण्यात आल आहे. दोन्ही दिव्यांग व्यक्तीच्या विविध मागण्यासाठी वाहनाच्या तोडफोडीचा प्रयत्न आणि वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
fight in Pimpri-Chinchwad and Maval is clear
पिंपरी-चिंचवड, मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती
पुण्यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण पवार यांची चारचाकी गाडी ‘ग’ क्षत्रीय कार्यालयाच्या आवारात पार्क करण्यात आली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास अपक्ष अंध उमेदवार विनायक सोपान ओव्हाळ आणि त्यांचा साथीदार नागेश काळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण पवार यांची गाडी फोडण्याचा आणि पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर तात्काळ आग विझवण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ओव्हाळ आणि काळे यांच्यासह चार जणांना ताब्यात घेतल आहे. ओव्हाळ आणि नागेश यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत.

हेही वाचा – पुण्यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी

दोघांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.

  • थेरगाव हॉस्पिटल येथे कॅन्टींग चालवण्यास मिळावे.
  • रांका ज्वेलर्स एम्पायर इस्टेट येथे रसवंतीगृह चालवण्यास परवानगी देण्यात यावी.
  • रमाई आवास योजनेअंतर्गत घर मिळालेले नाही.
  • पत्नीस नोकरी मिळाली नाही.
  • नागेश काळे हे दिव्यांग असून त्यांचं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अद्याप घर मिळाले नाही. ते वेटिंगवर आहे.

Story img Loader