सूर्यापेक्षा मोठय़ा ११ अनोख्या ताऱ्यांचा शोध

अनोख्या ताऱ्यांच्या संशोधनाचा शोधनिबंध द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल या संशोधन प्रत्रिकेसाठी स्वीकारण्यात आला आहे.

(प्रातिनिधीक छायाचित्र (सौजन्य- नासा )

राष्ट्रीय रेडिओ खगोलड्टाौतिकी केंद्राकडून चुंबकीय क्षेत्राच्या अड्टयासाला नवी दिशा

पुणे : आपल्या सूर्यापेक्षा आकारमान आणि तापमान जास्त असलेल्या, पृथ्वीपासून १५४ प्रकाशवर्षे दूर असलेले अकरा एमआरपी (मेन सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर) किंवा अनोखे तारे शोधण्यात पुण्याच्या राष्ट्रीय रेडिओ खगोलड्टाौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञांना यश आले आहे.

अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (यूजीएमआरटी) या रेडिओ दुर्बिणीद्वारे आतापर्यंत अकरा अनोख्या ताऱ्यांचा शोध लावण्यात आला असून, त्यापैकी आठ तारे २०२१ मध्ये शोधण्यात आले आहेत. या संशोधनामुळे ताऱ्यांच्या उत्सर्जनाच्या संकल्पनेला नवी दिशा मिळून ताऱ्यांच्या चुंबकीय क्षेत्राच्या अड्टयासाचे नवे क्षेत्र खुले झाले आहे.

संशोधक बर्नाली दास यांनी या संशोधनाची पत्रकार परिषदेत माहिती दिली. संशोधनातील मार्गदर्शक डॉ. पूनम चंद्रा, एनसीआरएचे संचालक प्रा. यशवंत गुप्ता, प्रा. जयराम चेंगलूर, डॉ. जे. के. सोळंकी आदी या वेळी उपस्थित होते. अनोख्या ताऱ्यांच्या संशोधनाचा शोधनिबंध द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल या संशोधन प्रत्रिकेसाठी स्वीकारण्यात आला आहे.  डॉ. चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली या संशोधनाचा समावेश असलेला पीएच.डी. प्रबंध बर्नाली दास यांनी पूर्ण केला आहे. यूजीएमआरटीसह अमेरिकेतील कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज अ‍ॅरे या दुर्बिणीचाही संशोधनासाठी वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी अशाच एका ताऱ्याचा शोध लावला होता. त्यानंतर तसे गुणधर्म दाखवणारा तारा आढळला नव्हता. मात्र  गेल्या दोन वर्षांत बर्नाली दास यांनी अकरा ताऱ्यांचा शोध लावला आहे.

संशोधनाविषयी बर्नाली दास म्हणाल्या, की दृष्य प्रकाशाच्या सहाय्याने निरीक्षणे घेणाऱ्या दुर्बिणींकडून आकाशगंगेतील ताऱ्यांसंबंधी माहिती संकलित करण्यात आली. ताकदीने रेडिओ  आणि लहरी चुंबकीय उत्सर्जित करू शकणाऱ्या संड्टााव्य ताऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर यूजीएमआरटीच्या सहाय्याने विशिष्ट वेळी आणि विशिष्ट वारंवारितेला निरीक्षणे घेण्यात आली. मेन सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर (एमआरपी) या ताऱ्यांचे नामकरण करण्यात आले. 

ताऱ्याचे तापमान आणि चुंबकीय क्षेत्र रेडिओ लहरींची तीव्रता ठरवण्यात ड्टाूमिका बजावत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.  महाकाय चुंबकीय ताऱ्यांवर विशिष्ट ठिकाणी होणाऱ्या स्फोटांची पहिल्यांदाच माहिती मिळाली आहे. प्रचंड ताकदीने पल्सारप्रमाणे लहरी ऊर्जित करणाऱ्या या ताऱ्यांची संख्या वाढल्यामुळे ड्टाविष्यातील संशोधनाला  दिशा मिळेल. त्या दृष्टीने संशोधन सुरू केल्याचे डॉ. चंद्रा यांनी सांगितले.

ड्टारमणकाल, स्थान आदी वैशिष्टय़े 

  • पल्सारसदृश्य लहरींचे उत्सर्जन
  • ताऱ्यांचा स्वत:ड्टाोवती फिरण्यासाठी अर्धा दिवस ते अधिकाधिकाधिक चार दिवसांचा कालावधी
  • ताऱ्यांमध्ये होणारे लघुस्फोट पहिल्यांदाच शोधले जाऊन अधोरेखित
  • आपल्या सूर्याच्या दुपटीपेक्षा अधिक, सूर्यापेक्षा वस्तुमान आणि तापमान अधिक
  • पृथ्वीपासून १५४ प्रकाशवर्षे दूर
  • सर्व ताऱ्यांचे स्थान आपल्या आकाशगंगेतील कन्या राशीमध्ये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Discovery stars sun ysh

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या