खुन्नस ने पाहण्यावरून १६ वर्षीय मुलांमध्ये वाद; २० वर्षीय तरुणाचा खून

ज्या वयात शिक्षणाचे धडे घ्यायचे असतात त्याच वयात आता एकमेकांकडे खुन्नस ने पाहण्यावरून खुनाचा घटना घडत आहेत.

Disputes among 16 year olds over seeing Khunnas Murder 20 year old man
पोलिसांनी १२ तासाच्या आत आरोपींना जेरबंद केले आहे.

शिक्षण घेण्याच्या वयात मुले होत आहेत गुन्हेगार

ज्या वयात शिक्षणाचे धडे घ्यायचे असतात त्याच वयात आता एकमेकांकडे खुन्नस ने पाहण्यावरून खुनाचा घटना घडत आहेत. चिंचवडमध्ये अवघ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलांनी एकमेकांडे खुन्नस ने पाहिले म्हणून झालेल्या वादात वीस वर्षीय तरुणाचा हकनाक बळी गेलाय. गणेश याड्रमी अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी मिळून जीवे ठार मारले आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून इतर तिघांना अटक करण्यात आली आहे.

अमेय उर्फ बंटी शांताराम ठाकरे (शिक्षण १० वी पास), आकाश जालिंदर गायकवाड, प्रकाश जालिंदर गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, पहिला अल्पवयीन मुलगा इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेत आहे, दुसरा १० वी पास झालेला आहे, तिसरा अल्पवयीन हा १२ वी पास आहे. या तिघांचा देखील खुनाचा गुन्ह्यात सहभाग आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश याचा मित्र हितेश पाटील वय- १६ वर्षे याचे आणि अल्पयीन आरोपी यांचे एकमेकांकडे खुन्नस ने पाहण्यावरून वाद झाले होते. तेव्हा, बदला घेण्याच्या हेतूने आरोपी बंटी ठाकरे याने त्याच्या जवळील चाकूने गणेश याड्रमी याच्या (छातीत) पोटात चाकू खुपसून खून केला. इतर अल्पवयीन आरोपींनी त्यांच्याकडील कोयते, लाकडी बांबूंनी मयताचे मित्र यांना मारून जखमी केले. या घटनेत दहावीत शिक्षण घेणाऱ्या आणि उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सहभाग असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे. अल्पवयीन मुलांच्या वादात हकनाक वीस वर्षीय गणेश ला आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेच्या काही अंतराने सर्व आरोपी फरार झाले होते. त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक ठुबल यांच्या पथकाने अवघ्या १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. सहा आरोपी पैकी तीन हे अल्पवयीन आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Disputes among 16 year olds over seeing khunnas murder 20 year old man ssh 93 kjp