scorecardresearch

अवघ्या अडीच लाख तिरंग्यांचे वितरण

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध माध्यमातून महापालिकेला उपलब्ध झालेल्या १२ लाख तिरंग्यांपैकी अवघ्या अडीच लाख झेंड्यांचे वितरण महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले आहे.

अवघ्या अडीच लाख तिरंग्यांचे वितरण
संग्रहित छायाचित्र

पुणे : हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध माध्यमातून महापालिकेला उपलब्ध झालेल्या १२ लाख तिरंग्यांपैकी अवघ्या अडीच लाख झेंड्यांचे वितरण महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेकडून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पाच लाख तिरंग्यांचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३०० केंद्रेही त्यासाठी करण्यात आली आहेत. त्यासाठी महापालिकेने पाच लाख झेंड्यांनी खरेदी केली असून कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) आणि शासनाकडून महापालिकेला एकूण बारा लाख झेंडे उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी महापालिकेला उपलब्ध झालेले झेंडे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते परत पाठविण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली होती. मात्र महाालिकेला मिळालेल्या एकूण झेंड्यांपैकी केवळ २० टक्के झेंडेच वितरण योग्य असल्याचे पुढे आले आहे.

महापालिकेकडून शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांना चार लाख झेंड्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत केवळ अडीच लाख झेंड्यांचे वितरण क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले. त्यामुळे उर्वरीत झेंडे पुर‌वठादार ठेकेदारांकडे पाठविण्यात येणार आहेत. शासनाकडून महापालिकेला २ लाख ७१ हजार, कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून पाच लाख झेंडे उपलब्ध झाले आहेत. तर ४ लाख ७५ हजार झेंड्यांची खरेदी महापालिकेने केली आहे. महापालिकेला उपलब्ध झालेल्या झेंड्यांची गुणवत्ता तपासून वितरण केले जात आहे. मात्र उर्वरीत झेंड्यांचे काय करायचे, असा प्रश्न महापालिकेपुढे उपस्थित झाला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.