सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या आवारात बेकायदा प्रवेश करून संस्थेतील संचालकांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – पुणे : हिरवी मिरचीच्या दरात वाढ, बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर

aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी
Case of Allegedly Inciting Speech Demand to file case against Nitesh Rane and Geeta Jain
कथित प्रक्षोभक भाषण केल्याचे प्रकरण : नितेश राणे, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करा

हेही वाचा – पुणे : नवले पुलाजवळील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, तिघांवर गुन्हा; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर यांच्यासह ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेडेकर हे पुणे विद्यार्थी गृह संस्थेत कार्याध्यक्ष आहेत. तेथील एका कर्मचाऱ्याचे वेतनाबाबत संस्था चालकांशी वाद सुरू आहेत. कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून शिळीमकर जमावासमवेत संस्थेत गेले. त्यांनी रेडेकर यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे रेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंभारे तपास करत आहेत.